निर्भीडसत्ता न्यूज –
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती उत्सवात भक्तजन मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सकाळ पासून पाऊस सुरु असल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली असल्याने आता हळूहळू शिवाजी रस्त्यावर भाविकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. तसेच संपुर्ण दगडूशेठ गणपतीच्या परिसरात सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे.
प्रतिष्ठापनेपूर्वीची मिरवणूक आणि लहान मुलांचे पथक गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या पुष्परथामध्ये श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत प्रभात बँड, दरबार बँड आणि महिलांचे ‘दामिनी’ ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे. छत्र्यांसह कॅमेरे सांभाळत अनेक भाविंक मिरवणुकीची वाट पाहत उभे आहेत.
तसेच रांगोळ्या काढणाऱ्यांची लगबग सुरू झाली व गणेशाच्या आगमनाचे उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले आहे.मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार, मंडई टिळक पुतळ्यामार्गे उत्सव मंडपात पुष्परथातून मिरवणूक येईल.