निर्भीडसत्ता न्यूज –
धकधक गर्ल माधुरी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार. पुन्हा एकदा माधुरी दीक्षित मराठीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत. माधुरी मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे समजतंय. नव्वदच्या दशकात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी “धकधक” गर्ल आता मराठी रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, मात्र माधुरी कोणत्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार नसून मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे बोलले जात आहे.