निर्भीडसत्ता न्यूज –
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पदकापासून एका विजयाच्या अंतरावर आहेत. गुरुवारी या दोघांनीही एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे.
2013 – 14 मध्ये जागतिक कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूने एक तास आणि 27 मिनिटे रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत हाँगकाँगच्या चेयुंग नगान यि हिचा 19 – 21, 23 21, 21- 17 असा पराभव केला. 22वर्षीय सिंधू दुसऱ्या गेममध्ये 13 – 16 अशी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर दमदार मुसंडी मारत हा गेम जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत तिची चीनच्या सन यू हिच्याशी गाठ पडणार आहे.