पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
शिरूर लोकसभा मतदार संघातील भोसरी विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी भोसरी येथील भैरवनाथ विद्यालयात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. निवडणूक-लोकशाहीचा उत्सव या विषयावर आधारित या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आकर्षक चित्र रेखाटली.
यावेळी भोसरी मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवणनाथ लबडे, तहसिलदार सतीश थेटे, शिक्षणाधिकारी संगीता घोडेकर-बांगर, नायब तहसिलदार अपर्णा देशपांडे, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान आदी उपस्थित होते. यांच्या सहाय्यक नोडल अधिकारी अमोल फुंदे यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे महत्त्व पटवून दिले. विनायक भुजबळ यांनी मतदार प्रतिज्ञा घेऊन तिचा आशय समजावून दिला.