निर्भीडसत्ता न्यूज –
शहरात वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात शुक्रवारी आगमन झालेल्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन शनिवारी करण्यात आले. दीड दिवसाचा पाहुणचार स्विकारून गणरायांनीही भक्तांचा निरोप घेतला.
पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी वाजत-गाजत आनंदी, उत्साहात गणरायाचे आगमन झाले. दीड दिवसाच्या पाहुणचारानतर अनेक घरगुती गणपतीचे ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे निमंत्रण देत जड अंतकरणाने विसर्जन करण्यात आले. बाप्पा दीड दिवसासाठी आले असले, तरी त्यांची मनोभावे सेवा भाविकांनी केली. नंतर विधीवत पूजा करून शनिवारी विसर्जित केले. शहरात नदीपात्रात, भोसरीत विहीरीत, निगडीत गणेश तलावात आणि अनेक ठिकाणी कुत्रिम हौदात या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनस्थळी निर्माल्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती.