निर्भीडसत्ता न्यूज –
स्वाईन फ्लूमुळे पिंपरीतील मोरवाडीत राहणा-या एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मोरवाडीत राहणा-या या महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळने १७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने उपचारादरम्यान गुरुवारी (दि.२४) त्यांचा मृत्यू झाला. चालू वर्षात आजअखेर २८७ रुग्णांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ३६ रुग्णांचा मृत्यू झाला असून २३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १८ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालय उपचार आहेत.