निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका शाळेतील वरिष्ठ शिक्षक विद्यार्थीनींसोबत अश्लिल चाळे करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सुमारे ३० विद्यार्थीनींनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणी बाळासाहेब मारुती आल्हाट (वय 49, रा. पिंपळेगुरव) शनिवारी (दि. २६) या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या एका शाळेतील ८ वी, ९ वी आणि १० वीच्या वर्गातील विद्यार्थींसोबत शाळेचे वरिष्ठ शिक्षक अश्लिल चाळे, शरिराला स्पर्श करणे अश्या प्रकारचे प्रकार घडत होते. याबाबत संबंधित मुलींनी शाळेतील इतर शिक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र त्याकडे दर्लक्ष केले जात असल्याने सुमारे ३० विद्यार्थीनींनी संबंधित शिक्षकाविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.