प्रभाग १७ मध्ये स्वच्छता अभियान उपक्रम
निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका परिसरात डेंग्यू, मलेरिया सारखे आजार उद्भवू नये, यासाठी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी आपला आजू-बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले आहे.
महापालिकेच्या विशेष स्वच्छता अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक १७ मध्ये स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली. नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली दि. ८ रोजी चिंतामणी चौक, चिंचवडे कॉलनी १, चिंचवडे कॉलनी २, प्रेरणा विद्यालय. दि.९ रोजी शिवनगरी परिसर, गणेश कॉलनी, सिद्धेश्वर कॉलनी. दि. १० रोजी चिंचवडे नगर, सोपान बाग कॉलनी, नंदनवन कॉलनी, सिद्धीविनायक कॉलनी आणि दगडोबा चौक आदी ठिकाणी हा उपक्रम पार पडला.
नगरसेविका करुणा चिंचवडे म्हणाल्या, स्वच्छता अभियानात महिलांचा सहभाग आवश्यक आहे. घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून महापालिकेला सहकार्य करावे. यावेळी, आरोग्य विभागाचे अधिकारी उज्जैनवाल, वसंत सरोदे, के.डी. दरोडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, योगेश महाजन, सचिन काळभोर, रविंद्र ढाके, पिंटु चिंचवडे, शिरीष कर्णिक, शुभम ढाके, सचिन वाणी, प्रदिप पटेल, शंकर पाटील, प्रवीण पाटील, वासूदेव कोळी, गौरव पवार, भावेश पवार, कैलास रोटे, राजेंद्र मगरे, रविंद्र माळी, सचिन टेकळे, नरेंद्र माळी आदींनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.