निर्भीडसत्ता न्यूज –
सई ताम्हणकरला मराठी चित्रपटांना ग्लॅमर प्राप्त करून देणारी तसेच भूमिकांमध्ये निर्भीडपणे नवनवे प्रयोगकरणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सई फक्त मराठी चित्रपटापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तिने आपली अभिनयसंपन्नता दुनियादारी, तू ही रे, प्यारवाली लव्हस्टोरी, जाऊ द्याना बाळासाहेब, नो एंट्रीपुढे धोका आहे, पुणे ५२, वजनदार सारख्याअसंख्य मराठी चित्रपटांमधून सिद्ध केलीआहे. तिने आमिर खान अभिनित‘गजनी’द्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.तिच्या ‘हंटर’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दिली.
भूमिकेच्या लांबीला महत्व न देता चांगला रोल महत्वाचा असे मानत आल्यामुळे ती आता दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्याळम आणि तामिळ भाषेतबनत असलेल्या ‘सोलो’ या चित्रपटात सई ‘सती’नामक महत्वाची भूमिका साकारताना दिसणारआहे. बिजॉय नम्बियार याने ‘सोलो’ याचित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट सुरुवातीला फक्त मल्याळम भाषेत बनणार होता परंतु नंतर तामिळमधेही शूटकरण्याचे ठरले. चित्रपटाची कहाणी निवडक वेचककथा असून चार वेगवेगळ्या व्यक्तींची असून चार मूलघटकांवर, म्हणजे पृथ्वी,रुद्र,अग्नी, वायू आणि जल यावर केंद्रित असून ती नंतर एकत्रितपणे बांधली जाते.
‘सोलो’ चित्रपट रोमँटिक थ्रिलर असून बिजॉयनम्बियार अब्राहाम मॅथ्यू बरोबर मल्याळम आणिअनिल जैन बरोबर तामिळ भागांची निर्मितीकरीत आहे. दलकीर सलमान, नेहा शर्मा, दिनोमोरिया, श्रुती हरिहरन, साई धनिका, दीप्ती सती,सतीश, जॉन विजय, मनोज जयन आणि सईताम्हणकर यांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकाआहेत. ‘सोलो’ चित्रपट मल्याळम आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांची सुपरस्टार सई ताम्हणकरचे आता दाक्षिणात्यफॅन्स पण असतील एवढे मात्र नक्की.