निर्भीडसत्ता न्यूज –
केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कै अण्णासाहेब मगर यांच्या जीवनावरील कर्मयोगी अण्णासाहेब मगर: काळ, व्यक्तित्व, कर्तृत्व या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
लेखीकेचे मार्गदर्शक डॉ. राजा दीक्षित, मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, उपमहापौर निलेश मगर, सागर काळभोर ,लेखिका सीमा काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
हा ग्रंथ पीएच.डी च्या संशोधनावर आधारित आहे. अमेय प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशीत केलेला आहे. या ग्रंथाला शरद पवार यांची प्रस्तावना लाभलेली आहे. आधुनिक पुणे जिल्ह्याचे शिल्पकार, सामाजिक व राजकीय जीवनातील रिंगमास्टर होते. अशा शब्दांमध्ये प्रस्तावनेमध्ये अण्णासाहेबांच्या बद्ल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या संशोधनात्मक ग्रंथांमुळे अतिशय महत्त्वाच्या दुर्लक्षित अशा विषयावर प्रकाश टाकणे शक्य झाले आहे. अण्णासाहेबांनी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळय़ा भागांमध्ये विविध सहकारी संस्था स्थापन करून पुणे जिल्ह्याचा विकास केला होता. त्यांनी संपूर्ण जीवन चरित्राची माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळेल. हा ग्रंथ संशोधनात्मक आणि त्याला सहकाराची जोड असल्यामुळे ग्रंथ संशोधन करणारा विद्यार्थीवर्ग तसेच वाचकांसाठी उपयुक्त ठरेल असे मत लेखिका काळभोर यांनी व्यक्त केले.