निर्भीडसत्ता न्यूज –
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा.लि निर्मित अवधूत गुप्ते प्रस्तूत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित” बॉईज” सिनेमाच्या टिमला दस्तुरखुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी आशीर्वाद दिला. लालासाहेब शिंदे व राजेंद्र शिंदे निर्मित नुकताच दि. ८ रोजी प्रदर्शित झालेल्या बॉईज ला रसिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
पार्थ भालेराव,सुमंत शिंदे,प्रतिक लाड यांनी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. व कौतुक केले. “बि बिंनी” मराठी सिनेमाने उंच भरारी घेतली आहे असे कौतुकास्पद वाक्य खुद्द ट्विटर वर केले आहे.
बॉईज सिनेमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या सुमंतच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सनी लिओनने सादर केलेली बॉईज मधील लावणी सिनेमाला उंचीवर घेवून जाते.
अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली सर्वच गाणी गाजली. “आम्ही लग्नाळू” या गाण्यावर रसिक थिएटरमध्ये नाचतांना दिसून आले. सुमंत,पार्थ,प्रतिक, संतोष जुवेकर,भाऊ कदम,शिल्पा तुळसकर,झाकिर हुसेन यांच्या अभिनयाने नटलेला,संगीताने सजलेला,सनी लिओनचे नृत्य यामुळे बॉईज हा रसिकांना प्रचंड आवडला आहे.