निर्भीडसत्ता न्यूज –
भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा वन डे सामना आज पुण्यातील गहुंजेच्या एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं वानखेडे स्टेडियमवर विजयी सलामी दिली. त्यामुळं मालिकेतलं आव्हान राखायचं तर, टीम इंडियाला दुसरा वन डे सामना जिंकावाच लागेल. न्यूझीलंडविरुद्धची वन डेची दुसरी लढाई टीम इंडिया इतकीच केदार जाधवसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे.