पोलिस फ्रेंडस् वेल्फेअर असोसिएशनचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा
निर्भीडसत्ता न्यूज –
पोलिसांच्या घरकुलाचा प्रश्न, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पोलीस ठाण्यातील अपुरे मनुष्यबळ त्यामुळे कर्तव्य बजावताना पोलिसांवर येणारा ताण परिणामी त्यांचे बिघडणारे आरोग्य आदी प्रश्न सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी पोलिस फ्रेंडस् वेल्फेअर असोसिएशनने आपली ताकद पणाला लावावी, असे आवाहन मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी गुरुवारी (दि. ९) केले.
महाराष्ट्र प्रदेश पोलिस फ्रेंडस् वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने डांगे चौक येथील सतिश एक्सक्यूटीव्ह हॉटेल मध्ये झालेल्या नियुक्ती प्रदान सोहळ्यात आमदार भेगडे बोलत होते.
यावेळी महापौर नितीन काळजे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरके, उद्योजक अमित गोरखे, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, प्रदेश कार्याध्यक्ष गोपाळ बिरारी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल राऊत, प्रदेश संपर्क प्रमुख हरीश मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. तर महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते असोसिएशनच्या बोध चिन्हाचे अनावरण झाले. त्यांनी असोसिएशच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, मातोश्री प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष सचिन सुरवसे, मराठा महासंघ पुणे जिल्हा सचिव मयुर सोळसकर यांचा सत्कार करण्यात आला.