निर्भीडसत्ता न्यूज –
‘बाहुबली’तील देवसेनेच्या भूमिकेमुळे देशभरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या सौंदर्याने अनेक तरूणांना घायाळ केले आहे. पण अनुष्का शेट्टीचे मन दुसऱ्याच कुणावर तरी जडले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, राहुल द्रविड असा गौप्यस्फोट तिने केला आहे. एका तामीळ पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिने ही ‘मन की बात’ सांगितली.