निर्भीड न्यूज –
चंद्रकांत (अण्णा) नखाते युवा मंचतर्फे भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अर्थात 125 व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
माजी नगरसेवक चंद्रकांत (अण्णा) नखाते यांच्या रहाटणीतील संपर्क कार्यालय येथे प्रदर्शन घेण्यात आले आहे. या प्रदर्शनात नामवंत लेखकांची विविध विषयांवरील पुस्तके असून, या पुस्तकांचे विक्री मूल्य केवळ 50 रुपये आहे. त्यामुळे पुस्तकप्रेमी आणि वाचकांना केवळ 50 रुपयांत आपल्या आवडीचे पुस्तक खरेदी करता येणार आहे.
विश्वनाथ हाळनोर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
माजी नगरसेवक चंद्रकांत (अण्णा) नखाते, माजी नगरसेविका सविता नखाते, शुभम नखाते, सुरेश गुरव, रसाळ तात्या, नारायण पवार यांच्यासह जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि युवा मंचचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.