निर्भीड न्यूज –
मी माझ्या आयुष्यातील अखेरचे दिवस बुध्द धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी व्यतीत करून संपूर्ण भारत बौध्दमय करणार आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे स्वप्न सत्यात आणायचे असेल, तर प्रत्येक बौध्द बांधवांनी स्वत:पासूनच तथागत गौतम बुध्दांच्या शिकवणीचे आचरण करावे, असे प्रतिपादन भन्ते अश्वजित यांनी चिंचवड येथे केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शाहूनगर येथील धम्मचक्र बुध्दविहारात आयोजित केलेल्या प्रवचनात ते बोलत होते. सुरेश कसबे, एस. एल. वानखेडे, उमेश बनसोडे आदी या वेळी उपस्थित होते.
सुरेश कसबे यांच्या हस्ते 125 बौध्द बंधू-भगिनींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रती भेट देण्यात आल्या. उपस्थित महिला भगिंनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भीमगीते व पाळणा गीते सादर केली. सर्व उपासकांनी बुध्दवंदना घेतली. आशा अहिवळे यांनी सूत्रसंचालन केले. सिध्दार्थ अहिवळे यांनी आभार मानले.