निर्भीड न्यूज –
रहाटणी गावातील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात सकाळपासूनच नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कीर्तन, भजन आणि ‘राम जन्मला गं सखे…’ यासह राम जन्माचा पाळणा म्हणत महिलांनी रामाच्या जन्माचा आनंद साजरा केला.
राम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम सेवा ट्रस्ट व रहाटणी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचा समारोप हभप अशोक महाराज हुंबे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला.
हभप हुंबे महाराज यांनी संत तुकारामांच्या अभंगाचे निरुपण करीत कीर्तन सादर केले. राम जन्मकथा सांगत दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मंदिरात रामाची मूर्ती ठेवलेला पाळणा हलवित राम जन्म साजरा करण्यात आला.
खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, नगरसेवक शत्रुघ्न ऊर्फ बापू काटे, विनोद नढे, महापालिका स्थायी समितीचे सदस्य कैलास थोपटे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, महापालिका ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य सागर कोकणे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेविका सविता नखाते, माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे (पाटील), राष्ट्रवादी काँग्रेस वारकरी सेलचे शहराध्यक्ष सखाराम नखाते, हरेश तापकीर, विनोद तापकीर, चंद्रकांत तापकीर, हरेश नखाते, नीलेश काटे, श्रीराम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अंकुश राजवाडे, हभप सुदाम कापसे, संदीप गोडांबे, ऋषिकेश वाघेरे, सागर तापकीर, शुभम नखाते आदी या वेळी उपस्थित होते.
श्रीराम जन्मोत्सव कीर्तन सोहळ्याचे हे 79 वे वर्ष होते. शुक्रवार, दि. 8 एप्रिलपासून दररोज कीर्तन आयोजित करण्यात आले होते. शुक्रवार, दि. 15 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन आणि रामजन्मोत्सवानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, पिंपरीगावसह परिसरातील नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.