निर्भीड न्यूज –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरुवार, दि. 14 एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे आणि दापोडी येथे अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे पिंपरी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारीतीत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौक आणि दापोडी येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, महापालिका आयुक्त राजीव जाधव, महापालिकेचे विरोधी पक्षनेता राहुल भोसले, नगरसेविका नंदा ताकवणे, आशा सूर्यवंशी, वनिता थोरात, स्वाती साने, रमा ओव्हाळ, मंदाकिनी ठाकरे, शहर अभियंता महादेव कांबळे, अण्णा बोदडे आदी या वेळी उपस्थित होते.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दुपारी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी उपस्थित हजारो नागरिकांनी जल्लोष करीत बाबासाहेबांचा जयघोष केला.