निर्भीड न्यूज –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नगरसेविका अनिता मच्छिंद्र तापकीर यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. मच्छिंद्र तापकीर सोशल फाउंडेशनतर्फे काळेवाडी येथील तापकीर चौकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, सागर तापकीर, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सरोदे, सुभाष मुळे, प्रभाकर गुरव, विशाल गवळी, राकेश कपूर, अनिल औसरमल, संजय शेलार, रामलाल कुमावत, संभाजी तुपेरे, शशिकांत वखारे, नवनाथ पवार, सचिन लिमकर, जहांगीर शेख, बिलाल आत्तार, हर्षद परमार, बाळा कदम, दौलतराव वाघ, साई तिलक, सुनील म्हस्के, बापू बाल्लळा, सौदागर केमदरणे आदी या वेळी उपस्थित होते.
काळेवाडी आणि रहाटणी येथील प्रभाग क्रमांक 46, 47 आणि 48 येथील सुमारे शंभर सफाई कर्मचा-यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. महिला कर्मचा-यांना साडी आणि पुरूष कर्मचा-यांना जेवणाचे डबे (टिफीन) वाटप करण्यात आले.
नगरसेविका तापकीर म्हणाल्या की, सफाई कर्मचा-यांमुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होत आहे. या कर्मचा-यांचे आरोग्य टिकून राहणे महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वांना समानतेची वागणूक मिळत आहे. सफाई कर्मचा-यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलत आहे.