निर्भीडसत्ता न्यूज –
शहरामध्ये तिन वेगवेगळ्या ठिकाणी एका तरुणासह दोन महिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमिला प्रकाश हासे (वय ५५, रा. मोशी), कल्पना ऊर्फ निशा सिद्धार्थ गायकवाड (वय ३०. रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड) आणि रोहन नंदकुमार घोडके (वय २५, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे आत्महत्या करणा-या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील प्रमिला यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यात दहा वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला होता. त्याच नैराश्यातून त्यांनी छताच्या पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तर, वाकडमधील कल्पना या विवाहित असून त्यांनी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. चारित्र्यांवर संशय घेतल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची तक्रार विवाहितेच्या आईने दिली आहे. त्यानुसार पती सिद्धार्थ सोमनाथ गायकवाड, सासरा सोमनाथ गायकवाड, दीर शाम सोमनाथ गायकवाड घरातील दोन महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल ककण्यात आला आहे.
पिंपरीतील नेहरुनगर येथे रोहन घोडके याने घटना मंगळवारी (दि. २८) सायंकाळी चार वाजता चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाहीत.