पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या आवारात पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी बहुमजली इमारत बांधण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाला सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि. २८) ऐनवेळी मंजुरी देण्यात आली. वायसीएमसह इतर कामे मिळून सुमारे शंभर कोटींच्या उपसूना या सभेत ऐनवेळी मंजूर करण्यात आल्या.
महापौर नितीन काळजे सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी होते. वायसीएम ग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवजात अर्भक विभागाचे नुतनीकरण, डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नुतनीकरण अशी आवश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात ५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णालयासाठी राज्य सरकारने वाढीव ०.५० चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आर्किटेक्ट शशी प्रभू अॅण्ड असोसिएशन यांना सुधारीत नकाशे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात रुग्णालय आवारात बहुमजली वाहनतळ, कॅन्टीन, नाईट शेल्टर तसेच इतर आवश्यक कामांसह शस्त्रक्रिया संकुलाच्या एकत्रित आराखड्याचा समावेश आहे. या खर्चात वाढ करून ती ५० कोटींवर नेण्यात आली. त्यास सभेने मंजुरी दिली.