जयसिंगपूर/ प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने
मंदिराच्या दरवाजाचे काच फोडून आतील दोन सुमारे १ लाख ६० हजार रुपये असलेल्या दानपेट्या चोरुन नेल्याची घटना १ डिसेंबर रोजी रात्री घडली. याबाबत मंदिराचे पुजारी दिलीप बाळय्या जंगम यांनी जयसिंगपूर पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे़.
फिर्यादित म्हटले आहे की, १ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या दरवाजाच्या वरील बाजूस असणारे काच फोडून दरवाजाच्या आतील बाजूची कडी काढून मंदिरात प्रवेश केला़ यावेळी या चोरट्याने १० हजार रुपयाच्या दोन दानपेट्या व यामध्ये असलेले १ लाख ५० हजार रुपयाची रक्कम पळवून नेली आहे़. अधिक तपास पोलीस उपअधिक्षक सई भोरे-पाटील करीत आहेत.