निर्भीडसत्ता न्यूज –
बांधकामासाठीच्या पाण्याच्या टाकीत पडून बालकाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदारासह घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेकेदार महेश पवार आणि घरमालक संग्राम होकर्णे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत्यू झालेल्या आयुषचे (वय ३) वडील युवराज धोत्रे (वय ४७, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषचा २६ नोव्हेंबर रोजी रहाटणी येथील बांधकाम साईटवरील उघड्या टाकीत पडून मृत्यू झाला होता. तेथे संग्राम होकर्णे यांच्या घराचे काम सुरु होते. त्याचा ठेका महेश पवार यांच्याकडे होता. युवराज धोत्रे त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करतात. ते काम करताना त्यांचा मुलगा आयुष टाकीत पडला होता. त्याच्या मृत्यूस ठेकेदार व घरमालक कारणीभूत असल्याचे तपासात समोर आल्यान दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव तपास करत आहेत.