निर्भीडसत्ता न्यूज –
भोसरी येथील डायनोमर्क कंपनीत दत्त जयंती उत्साहास साजरी करण्यात आली. कंपनीत झालेल्या विविध कार्यक्रमामध्ये कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला.
दत्तांची विधीवत पुजा कंपनीच्या संचालिका आमिता राऊत व व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. या निमित्ताने कंपनीत स्वच्छता आभियान राबवण्यात आले. तसेच, भक्ती गिते सादर करण्यात आली. एचआर प्रमुख सूर्यकांत मुळे, श्रीकांत जोगदंड, आक्षरा राऊत, प्रिया देशमुख, प्रमोद पाटील, आनिल ढवळे, हेमंत नेमाडे यांनी संयोजन केले.