निर्भीड न्यूज –
भोसरी येथील खान्देश बहुउद्देशीय युवा मंचच्या वतीने आज (सोमवार, दि. 18 एप्रिल) खान्देश रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. मंचच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार आहे.
आमदार महेश लांडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे, ‘फॅन्ड्री’ फेम अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष बेंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, नगरसेवक वसंत लोंढे, नारायण बहिरवाडे, जालिंदर शिंदे, नगरसेविका अनुराधा गोफणे, सुनीता गवळी, शुभांगी लोंढे, उद्योजक राजू देशपांडे, परशुराम आल्हाट आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
काळेवाडी येथील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, बांधकाम व्यावसायिक सुरेश शिरुडे, पुण्याच्या माजी महापौर कमला व्यवहारे, उद्योजक भगवान गवळी, उद्योजक दीपक पाटील यांना खान्देश रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भावगीत आणि भक्तीगीतांचा कार्यक्रमही या वेळी होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष संजय ब्राह्मणकर, उपाध्यक्ष उमेश राजपूत, सचिव पिरण गवळी यांच्यासह मंचच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संयोजन केले आहे. प्रा. उदय पाटकर आणि विभावरी ब्राह्मणकर कायक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.