निर्भीड न्यूज –
लोणावळा येथील सिंहगड इजिनिअरिंग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी अर्थात 125 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्राचार्य डॉ. एम. एस. गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. प्रा. जे. बच्छाव, प्रा. प्रज्ञा कांबळे, राहुल बडेकर, रवी अंबुरे शीलादित्य कांबळे आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बच्छाव यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शीलादित्य कांबळे, राहुल बडेकर, रवी अंबुरे, विवेक नावकर, तुषार कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कौस्तुभ खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.