निर्भीडसत्ता न्यूज –
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ताथावडे येथील मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन पवार यांच्यावतीने डाँ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन पवार, प्रसाद पवार, समीर वाघुले, ईश्वर अमोल पवार, फरताळे, ऊमेश अडसूळ, अतुल बोरगे, सचिन लांडगे उपस्थीत होते.
मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन पवार म्हणाले की, सक्षम समाज व सक्षम देश घडवायचा असल्यास बाबासाहेबांचे विचार आजच्या तरूण पिढिने अंगीकृत करणे गरजेचे आहे. आणी तिच परमपुज्य बाबासहेबांना खरी श्रद्धांजली आहे.