निर्भीडसत्ता न्यूज –
वाकडमध्ये एका २७ वर्षीय महिलेला आडवून तिच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी (दि. ७) घडला आहे. या प्रकरणी तिन तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास जनार्दन पवार, नितीन घोडेस्वार, प्रशांत जनार्दन पवार (रा. विजननगर, काळेवाडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे प्रथम सोसायटीजवळून पिडीत महिला जात होती. त्यावेळी तिघा आरोपीनी महिलेला आडविले. महिलेचे केस ओढून तिला मारहाण करण्यात आली. तसेच, विनयभंग करून महिलेच्या तोंडांवर अॅसिड फेकत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महिलेने केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक एम. एल. जाधव तपास करीत आहेत.