निर्भीडसत्ता न्यूज –
रहाटणी-पिंपळे सौदागर येथील नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर व परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी आज गुरुवारी (दि. 21) रुग्नवाहिकेचे लोकार्पण राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
पोपटराव जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष उत्तमराव धनवटे, शंकरराव काटे, चंद्रकांत काटे, कोर, संग्राम चव्हाण व पिंपळे सौदागर परिसरातील जेष्ठ नागरिक, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.
नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने गेल्या दोन वर्षापूर्वी रुग्नवाहिका सुविधा सुरू करण्यात आली. परिसरातील नागरिकांच्या सेवा या माध्यमातून दिल्या जातात. म्हणून परिसरातील नागरिकांसाठी आणखी दोन रुग्नवाहिका सेवा सुरु करण्याचा संकल्प नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.