निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागा’तर्फे कलाकारांच्या ‘मयूर करंडक क्रिकेट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एन. एच. – 9 संघ (हडपसर) हा संघ विजेता ठरला. ‘कॉपरकॉईन’ हा संघ द्वितीय तर ‘संस्कृती महाराष्ट्रा’ची टीम ‘ए’ हे तृतीय ठरले. ‘संस्कृती महाराष्ट्रा’ची टीम ‘बी’ ने चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे 9 वे वर्ष होते. 15 संघ सहभागी झाले होते.
शिवाजी उदय मंडळ मैदान (शिवाजीनगर) येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊसाहेब कुर्हाडे, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेवक नंदा लोणकर यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागा’चे शहराध्यक्ष बाबासाहेब पाटील स्वागत केले. नितीन मोरे, योगेश सुपेकर यांनी प्रास्ताविक केले. इक्बाल दरबार, माणिक बजाज, डॉ. रमेश खाडे, गिरीजा प्रभू उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाला 11 हजार व करंडक, उपविजेत्या संघाला 9 हजार व करंडक, तृतीय क्रमांकासाठी 7 हजार व करंडक, अशी बक्षीसे देण्यात आली. रोहित पठारे ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरले. चेतन चव्हाण (बेस्ट फिल्डर), मयूर जाधव (हॅटट्रीक), आबा सूर्यवंशी (बेस्ट कॅच), रोहित गायकवाड (बेस्ट बॅट्समन), सागर अडागळे (बेस्ट बॉलर), प्रकाश सुतार (बेस्ट कीपर) यांना गौरविण्यात आले.