निर्भीडसत्ता न्यूज –
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या विद्यार्थीनी राधा येळगावकर व गायत्री मारणे या सरकारी चित्रकला ग्रेड परिक्षा २०१७ स्पर्धेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आल्या आहेत.
या परिक्षेत राधा मंगेळ येळगावकर हिने राज्यात व्दितीय क्रमांक, तसेच स्थिर चित्र विषयात प्रथम, संकल्प चित्रात व्दितीय, स्मरणचित्रात चतुर्थ क्रमांक मिळविला. तर, गायत्री मारणे हिने राज्यात तृतीतय वस्थिरचित्र विषयात सातवा क्रमांक मिळविला आहे. तसेच, विद्यालयाचे एलिमेंटरी परिक्षेत ५७, तर इंटरमिजीएट परिक्षेत ४९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

विद्यार्थ्यांना कलाध्यापक अशोक कामथे यांनी मार्गदर्शन केले. तर, प्राचार्या प्रज्ञा पाटील, उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर, पर्यवेक्षक गदामे, मधुरा लुंकड, शिवराज पिपुंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.