निर्भीडसत्ता न्यूज –
मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने स्त्री शिक्षण व समतेचा संदेश देत जनजागृती करण्यात आली.
नवी सांगवीतील साई चौक, फेमस चौक, क्रांती चौक या मार्गे स्री हक्कांची जनजागृती पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेत संविधानाने दिलेल्या स्री-पुरुष समानता हक्का विषयी विविध स्लोगनचे हातात फलक, कविता व घोषना देत जनजागृती केली. शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी आंगावरील कपड्या समतेचा व संविधानीक हक्कांचे स्लोगन चिटकवून स्री शिक्षणाचे महत्वाविषयी जनजागृती केली.
लहान मुला-मुलींना महात्मा ज्योतीराव फुले व ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांच्या वेषात स्त्री शिक्षणाची जनजागृती केली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, अरुण मूसळे, ऋतुजा जोगदंड अँड सचिन काळे, संगिता जोगदंड, मिनु धूमाळ, सतिश लालबिगे, विकास शाहाने, मुरलीधर दळवी आदी उपस्थित होते.