निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून पिंपरीत उभारलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटन बुधवारी (दि. ३) आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, माजी महापौर अपर्णा डोके, डॉ.वैशाली घोडेकर, नगरसेवक संतोष लोंढे, राहुल जाधव, उत्तम केंदळे, कुंदन गायकवाड, संदिप वाघेरे, अनुराधा गोरखे, सुवर्णा बुर्डे, निकिता कदम, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, माजी नगरसदस्या शुभांगी लोंढे, लता ओव्हाळ, सहआयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मानव कांबळे, आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, अश्विनी सातव-डोके, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, विजय भुजबळ, सुरेश गायकवाड, गिरीष वाघमारे, दामु चंदनशिवे, ईश्वर कुदळे, प्रताप गुरव, विशाल जाधव, दिलीप गायकवाड, अजय जाधव, विठ्ठल लडकत, मधुकर टिळेकर शारदा मुंढे आदी उपस्थित होते.