सैनिक टाकळी / प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
सैनिक टाकळी येथील विमा प्रतिनिधी स्मिता शिवाजी बाबर यांना विमा क्षेत्रातील एम.डी.आर.टी २०१८ हा बहुमान मिळाला, तसेच अमेरिका येथे होणाऱ्या जागतिक विमा प्रतिनिधी शिबीरास निवड झाली. यासाठी त्यांना विपणन प्रबंधक को विभागाच्या ऋता आजगावकर, शाखा प्रबंधक एस.व्ही.कल्याणीकर व विकास अधिकारी अरविंद बगाडे या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी बोलताना स्मिता बाबर यांनी विमाधारकांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.