निर्भीडसत्ता न्यूज –
सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. यामुळे २०१७ संपता संपता सलमान खानने आपल्याच कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सलमान-कतरिनाच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने गेल्या तीन दिवसात तब्बल ११४ कोटींची कमाई केली आहे.सर्वाधिक कमाई करणारा सलमान खानचा हा १२वा चित्रपट आहे.
या चित्रपटाने देशातच १०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. सलमानने स्पर्धेतील इतर अभिनेत्यांनाही मागे टाकले आहे, असं ट्विट चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी केलं आहे. सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने देशात सर्वाधिक ३२०.४ कोटी तर ‘सुलतान’ चित्रपटाने ३००.४५ कोटींची कमाई केली होती. आता सलमानचा ‘टायगर जिंदा है’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरू आहे.