निर्भीडसत्ता न्यूज –
प्रभागातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत एका आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळित न केल्यास प्रशासनाचा निषेध करू, असा इशाराच मोरे यांनी दिला आहे.
निगडी, आकुर्डी, प्राधिकरण भागात तीन महिन्यांपासून विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांचे हाल होत आहे.प्रभागाच्या आवश्यकतेनुसार पुरेशे पाणी मिळत नाही. त्यासाठीपालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत. तशा सूचना उपमहापौर मोरे यांनी आज पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची बैठक घेवून केल्या.
बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे, प्रणीता कांबळे, काशीद, लवटे, वैद्य, आदी उपस्थित होते. सेक्टर २३ मध्ये उंच टाकी बांधल्यानंतर पाण्याची समस्या मिटेल, असे अधिका-यांनी म्हटले.