महाराष्ट्र महापौर परिषदेची १६ वी वार्षिक सभा सोमवारी (दि. ८) गोव्यातील पणजीमध्ये होत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांचे महापौर गोव्याला जाणार आहेत. दरम्यान, या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे आज (शुक्रवारी) रवाना झाले आहेत.
महारौष्ट्र महापौर परिषदेची १६ वी वार्षिक सभा गोव्यातील पणजीमध्ये सोमवारी होत आहे. तसे महापौर परिषदेचे अध्यक्ष व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कळविले आहे. राज्य शासनाने पालिकेच्या विकास आराखड्यात महिला उद्योग भवनासाठी जागा आरक्षित करणे, महापौरांना ठराविक रक्कमेची कामे करण्याचा अधिकार देणे, परिषदेच्या उपाध्यक्षांची निवड करणे हे प्रमुख विषय या परिषदेच्या अजेंड्यावर असून चर्चा करून त्यावर निर्णय होईल.