निर्भीडसत्ता न्यूज –
भोसरीतील एक पतसंस्था चोरट्यांनी फोडली असून १५ हजार रुपयांची रोकड लंपाल केली. चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मधुकर कुळधरण यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील पांजरपोळजवळील स्पाईनरोडला असलेल्या महात्मा फुले नागरी पतसंस्थेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. संस्थेचे शटर उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. कपाटाचे आणि ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातील एकूण १५ हजार रुपयांची रोकड चोरोट्यांनी लंपास केली आहे. चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.