निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या ४२५ कोटींच्या कामांमध्ये ९० कोटींचा भ्रष्टाचार झाला असताना आयुक्त श्रावण हर्डीकर ३० कोटींची बचत केल्याचा दावा करतात. त्यामुळे आतापर्यंत भाजपचे प्रवक्ते असणारे आयुक्त भाजपती वकीली करत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शनिवारी (दि.२०) केला.
यावेळी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, अनुराधा गोफणे, गीता मंचरकर आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४२५ कोटींच्या कामात भ्रष्ट्राचार झाल्याचे राष्ट्रवादीने निदर्शनास आणून दिले होते. तोच आरोप शिवसेना खासदारांनी केला आहे. यात ९० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड असताना ३० कोटी वाचविल्याचे सांगून आयुक्त हर्डीकर भाजप पदाधिका-यांना वाचवत आहेत.
भाजप सत्ताधारी पालिकेला लुटून खाण्याच्या तयारीत आहेत. त्यांची वकिली करण्यापेक्षा आयुक्तांवर ते थांबविण्याची तयारी आहे. ऐवढे पुरावे आम्ही देत असताना आयुक्त चौकशी व कारवाई सोडून बचतीचा खुलासा करत आहेत. जागा ताब्यात नसताना देखील रस्ते विकासांच्या कामे मंजूर केली. विकासकामांना विरोध नसून त्यातील भ्रष्ट्राचाराला विरोध आहे, असे वाघेरे, बहलांनी म्हटले आहे.