निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना व अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी एका महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरवमध्ये घडली.
देवीबाई राम पवार (वय २८) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव भागातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून मागील काही दिवसांपासून जोरजार कारवाई सुरु आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये. देवीबाई या महिनेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. महिला गंभीर जखमी झालयाने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार करून पुन्हा चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याआधी मागील आठवड्यात काही नागरिकांनी महापालिकेच्या बांधकामांवरील कारवाईला विरोध केला होता.