निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेने काढलेल्या ४२५ कोटींच्या कामांमध्ये रिंग करून ९० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. भाजप खासदारांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेतल्याने महापालिका प्रशासनाने सविस्तर अहवाल तयार केला आहे. त्यात ३२ कोटी रुपयांची वाचविल्याचा दावा महापालिका प्रशासाने केला आहे.
महापालिकेच्या ४२५ कोटींच्या कामांमधील भ्रष्टाचार प्रकरणाची जोरजार चर्चा मागील काही दिवसांपासून महापालिका व राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील निविदाप्रक्रिया नियमानुसार झाली आहे. या कामांमध्ये कुठेही भ्रष्ट्राचार झाला नसून ३० कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या अहवालात देखील एकूण ३२ कोटी ३३ लाख ६० हजार ३०७ रुपये वाचले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या आरोपांवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला टिकेचे लक्ष केले होते. परंतु, महापालिका प्रशासनाने केलेल्या दाव्यावरून भ्रष्टाचार झालाच नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे विरोधक काय भूमिका घेणार, हे बघावे लागणार आहे.