निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील घराघरातील कचरा गोळा करून वाहतुक करण्याचे काम काढले आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत २५२ कोटी रुपये ज्यादा देवून करदात्यांच्या पैशांच्या लुटीचा डाव सुरू आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढून हा गैरकारभार थांबवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत केली.
प्रशांत शितोळे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक नाना काटे, शाम लांडे, राजू बनसोडे यांनी या प्रकरणी आयुक्त हर्डीकर यांना पत्रव्यवहार केला आहे. त्याची माहिती देताना प्रशांत शितोळे म्हणाले, कचरा गोळा करण्याच्या कामाचे सध्याचे दर ९०० रुपये प्रति टन असताना नवीन कामात १९०० रुपेय दर दिले जाणार आहे. या कामात एजी अनव्हिरो व बीव्बीजी या दोन ठेकेदारांनी रिंग केली आहे. सल्लागार संस्था क्रिसीलने या ठेकेदाराच्या सोयीप्रमाणे अटी-शर्तींमध्ये बदल केले आहेत.
आठ वर्षांसाठी काम दिले जाणार असल्याने आठ वर्षे महापालिकेची लूट सुरू ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्यासाठी तो रोखण्यासाठी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत आहोत. शहरातील कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाकड रिंग प्रकरणाच्या आरोप करत चूक निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी आपली चूक सुधारली. त्यातून ४२ लाखांची पालिकेची बचत झाली. त्याप्रमाणे चूक दाखवून भ्रष्टाचार व गैरव्यवहार रोखण्याची मागणी आम्ही करत आहोत. त्यात नेमका चुका दाखवत असल्याने हेच पुरावे समजून आयुक्तांनी योग्य कारवाई करावी, अशी मागणी प्राशांत शितोळे यांनी केली आहे.