निर्भीडसत्ता न्यूज –
स्थायी समिती सभापती सीमा सावळे स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. स्थापत्य विभागाकडून भोसरीकडून निगडीकडे जाणा-या टेल्को रस्त्यावरील केएसबी चौक ते थरमॅक्स चौकपर्यंत डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. या कामासाठी ४ कोटी २० लाख १९ हजार ७९ रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. हे काम मे. मोहनलाल मथरानी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदाराला देण्यात आले आहे. तसेच, विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील दुरुस्तीच्या कामासाठी २ कोटी ७ लाख मंजूर करण्यात आले. दापोडी मैलाशुध्दीकर केंद्रा दुरुस्तीसाठी २ कोटी ७ लाख, कासरवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रासाठी २ कोटी ५ लाखांचा खर्च मंजूर केला आहे. च-होली डुडुळगाव येथील स्मशानभूमीच्या कामासाठी २ कोटी२७ लाख रुपयांच्या कामांना स्थायी समितीने मान्यता दिली.