निर्भीडसत्ता न्यूज –
केंद्र सरकारने केलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमधील वाढ ही सामान्य नागरिकांसाठी अतिशय जाचक आहे. भाटनगर परिसरात वाढते दुर्गंधीचे साम्राज्य आणि रहाटणी काळेवाडी परिसरात होत असलेला अनियमित पाणीपुरवठा याविरोधात शिवव्यापारी सेनेच्या वतीने मोरवाडी चौक येथे प्रशासनाविरोधात निदर्शने करण्यात आले. याबाबत शिवव्यापारी सेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टेकर यांना निवेदन देण्यात आले.
शिवव्यापारी सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष युवराज दाखले, शिवसेना विभाग प्रमुख खंडु शिरसाठ, लहु तिकोने, शिव व्यापारी सेना उपशहरप्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, गोरख पाटील, चिंचवड विधानसभाप्रमुख निलेश भोरे, बाळासाहेब गायकवाड, नाना गायकवाड, दत्ता गिरी, रोहीदास तांबे, दिपक कांबळे, माऊली जाधव, नितीन गायकवाड, आजय कांबळे, अरून गायकवाड, तुकाराम शिंदे, अक्षय थोरात, सोनु शिरसाठ, पुणे जिल्हा महीला संघटीका अनुजा कुमार शिंदे ,महीला शहर संघटीका भाग्यश्रीताई मस्के, संजय गांधी निराधार योजना पिंपरी विधानसभा सदस्या सारीकाताई तामचीकर, सिमा रावळकर, अनुसया तापचिकर, सोनी भाट, गिता माच्छरे, ममता माच्छरे, मंदाकिनी मोरे, मनिषा मगर, लक्ष्मी कांबळे व पदाधिकारी व महिला व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की, मागील काही महिन्यांपासून शासन सामान्य जनतेला केवळ आश्वासने देत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर विविध प्रकारचे कर लावून त्यांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. पेट्रोल दरवाढीचा आलेख दररोज वाढत आहे. राहटणी काळेवाडी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात आला आहे. तसेच भाटनगर परिसरात नियमित स्वच्छता राखण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे, याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. 15 दिवसात सर्व प्रश्न सोडवावेत असेही निवेदनातनमूद केले आहे.