निर्भीडसत्ता न्यूज –
सनदी अधिकारी होवुऩ प्रशासनाच्या माध्यमातुन देशाची सेवा करा. त्या आधी कामाचा ध्यास घ्या आणि हाती घेतलेले काम कमींटमेंट दिल्याप्रमाणे प्राधान्याने पुर्ण करा, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापालिका सहआयुक्त दिलीप गावडे. सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, प्रशासन अधिकारी राम किसन लटपटे, ग्रंथपाल प्रतिभा मुनावत, वर्षा जाधव, दिलीप धायगुडे, सुशीला कलापुरे आदी उपस्थित होते. अविनाश धर्माधिकारी म्हणाले, हाती घेतलेल्या कामावर श्रध्दा ठेवा. त्या कामाला न्याय द्या. वागण्या बोलण्याचे मॅनर्स असणे गरजेचे आहे. आपल्या बोलण्यात व वागण्यात शिष्टाचाराला अत्यंत महत्व आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदु मानुन त्यांच्या भल्यासाठी शासन काम करते. सामान्य माणसावर शासन चालते हे शासनकर्त्यांनी विसरु नये. नोटस् काढणे हे स्कील आहे. विषयाचा अभ्यास करतांना विषय पुर्णपणे कळावा यासाठी मेहनत घ्यावी.