निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात गरोदर महिलेला प्रसृती करण्यासाठी ऑपरेशन थिटरमध्ये घेवून जाण्यापुर्वीच त्याठिकाणी शॉर्टसर्कीटची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रुग्ण महिलेला तातडीने वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे सिझेरीन शस्त्रक्रिया करण्यात आली असून महिला व बाळ दोघे सुखरूप आहेत.
महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात एका गरोदर महिलेला प्रसृती करण्यासाठी दाखल केले होते. त्या महिलेला शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक पोटात कळा होवू लागल्या. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी सदरील महिलेला ऑपरेशन थिटरमध्ये घेवून जाण्याची तयारी सुरु केली. दुपारी अडीचच्या सुमारास ऑपरेशन थिटरमध्ये डॉक्टरांनी वीजेचे स्वीच चालू केले असता अचानक शॉटसर्कीट झाले. वैद्यकीय उपकरणाच्या सहायाने शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, शॉर्टसर्किटमुळे विद्युत उपकरणे बंद पडली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेला तत्काळ वायसीएम रुग्णालयात हलविले. याठिकाणी ऑफरेशन थिटरमध्ये महिलेवर सिझेरीन शस्त्रक्रिया करण्यात आली. महिला व तिचे बाळ सुखरुप आहे.
तालेरा रुग्णालयातील ऑफरेशन थिटरमध्ये अचानक झालेल्या शॉटसर्कीटची महापालिका विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्याची दुरुस्ती सुरु करण्यात आली. यापुर्वी देखील या रुग्णालयाच्या ऑफरेशन थिएटरमधील विविध कामांची दुरुस्ती करण्यासाठी एक महिना बंद ठेवले होते. याबाबत तालेरा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विना गंभीर म्हणाल्या की, गरोदर महिलेची सिझेरीन शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलेला ऑफरेशन थिटरमध्ये घेवून जाण्यापुर्वीच ऑफरेशन थिटरमध्ये शॉर्टसर्कीटची घटना घडली. परंतू, या घटनेत सदरील महिलेला कुठलीही इजा झालेली नाही. त्या महिलेवर वायसीएम रुग्णालयात यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.