निर्भीडसत्ता न्यूज –
देहुरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढते घरफोडया, चो-या, लुटमा-या, महीलांचे मंगळसुत्र हिसकावणे, अवैध धंदे आदी प्रकारच्या गुन्हे वाढत असल्याने अकार्यक्षम पोलिसांमुळे पोलीस ठाण्यात मरगळ आली आहे. ती दूर करण्याची मागणी शहर राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक महम्मद सुवेझ हक यांच्याकडे केली आहे.
देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहेत. अल्पवयीन मुलांच्या समावेशाने वारंवार घडणाऱ्या सशस्त्र हाणामाऱ्या, दहशत माजविणे, रोडरोमीयांची छेडछाडी, अल्पवयीन मुलासह धुमस्टाईलने कर्कश आवाजांचा तर सायरनच्या हार्न वाजवित भरधाव चालणाऱ्या दुचाकीबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे होणारे उल्लंघन, वरिष्ठांचे आदेश धुडकावत छुप्या स्वरूपात सुरू असलेले जुगार, मटका, गांजा, ताडी, गावठी हातभट्टी, दारू विक्री सारख्या अवैध धंदे, रस्त्यांवर तलवारीने केक कापून साजरे होणारे बर्थ डे तसेच लग्न समारंभात होणारे डीजेचा वापर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर देहुरोड येथे रस्त्याचे चौपदरीकरण काम सुरू असताना अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही सुरूच आहे,
अशा अनेक घटनांना पाहता पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा तर त्यांच्या अकार्यक्षमतेचा शहर राष्ट्रवादीने आरोप करीत पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आलेली मरगळ दूर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, महिलाध्यक्षा शितल हगवणे, ज्येष्ठ यदुनाथ डाखोरे, अंथोनी स्वामी, अजय भंबुक, रफीक शेख, रेणु रेड्डी, कैलास गोरवे, बाळासाहेब जाधव, गणेश कोळी, रफिक अत्तार, बॉबी डिक्का आदीच्या स्वाक्षरीचे निवेदन पोलीस अधीक्षक हक यांना देण्यात आले आहे.