पिंपळे सौदागर येथे अॅबॅकस आणि वैदिक गणितामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी येथील रहिवाशी कविता पाटील या गणितामध्ये स्पेशलायझेशनसह एम.एस्सी. पदवीधर आहेत. त्या येथील विद्यार्थ्यांसाठी सन 2010 पासून पिंपळे सौदागर येथे अॅबॅकस आणि वैदिक गणित वर्ग घेत आहेत. त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जिंकले आहेत. कविता पाटील या गेल्या 6 वर्षांपासून सलग फ्रँचाइझी पुरस्कार जिंकत आहेत दरवर्षीप्रमाणेच, या वर्षीही एक यशस्वी वर्ष होते ज्यात त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे जिंकता आले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते अॅबॅकस, वैदिक गणितामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
निर्भीडसत्ता न्यूज –
गुणवंत विद्यार्थी
अॅबॅकस मुंबई येथे सन २०१८ राज्य स्तरीय विद्यार्थी श्रेणी व विद्यार्थ्यांचे नाव
प्रथम – यशवंत यादव,
द्वितीय – मोहम्मद दर्गावला , माही मेहता, नील ईशान, अर्णव बोराडे,
तृतीय क्रमांक
रुद्र मंगेश पाटील, विहान गन्धम, श्रीनिधी बिरादार, आण्विक विश्वकर्मा, निहारिका झोपे.
वैदिक गणित राज्य स्तरीय २०१८ मुंबई;
द्वितीय क्रमांक
आयुष कुमार
अॅबॅकस राष्ट्रीय पातळी सन २०१८ थ्रिसुर केरळ.
चँपीयन ऑफ चँपीयन – शर्वरी चव्हाण,
प्रथम – यशवंत यादव,
पाचवा क्रमांक – मोहम्मद दर्गावाला,
पदवीधर राष्ट्रीय पातळी २०१८ थ्रिसुर केरळ
समय सावळ, केशिका शर्मा, प्रांजळ सेठी,सई मंगेश पाटील,हिमांशू पाटील, आर्या राउत,श्रेया मेहता,मृण्मयी साखरेकर,राघव दोडला, सिद्धी खडके, शंभावी पायगुडे, अनुप्रिया दास, साकार हिरडे
या सर्व विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थी,पालक,व रोझलँड रेसिडेन्सी मधील रहिवाशी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून कौतुक केले.