निर्भीडसत्ता न्यूज-
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमधून सभापती सीमा सावळे यांच्यासह आठ जण आऊट झाले आहेत. भाजपच्या सीमा सावळे, आशा शेंडगे, उषा मुंढे, कोमल मेवाणी, कुंदन गायकवाड, हर्षल ढोरे, तर राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर या सदस्यांना आज (बुधवारी) झालेल्या लकी ड्रॉमध्ये चिठ्ठीने बाहेरची वाट दाखविली आहे. दरम्यान, भाजपने अकराही सदस्यांचे राजीनामे घेतल्याची माहिती आहे.
भाजपचे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, राष्ट्रवादीचे अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेना अमित गावडे आणि अपक्ष कैलास बारणे हे सदस्य आहेत. त्यांच्यातील 8 सदस्य पहिल्या वर्षी निवृत्त होणार होते. त्यासाठी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत चिठ्ठ्याव्दारे या आठ सदस्यांची नावे काढण्यात आली.