निर्भीडसत्तान्यूज –
मेढा / जावळी
जावळी तालुक्याचे प्रशासकीय कारभाराचे ठिकाण मेढा येथे पंचायत समितीच्या आवारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी सोडला आहे. हा पुतळा लवकरच साकारण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यकत केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतभाऊ मानकुमरे यांना त्यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले.
सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक (बापू )गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा निर्धार केला आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुतळा उभारणीसाठी लागणा-या निधीची उभारणी करण्यास पदाधिकारी सज्ज झाले आहेत.
भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या दरे बुद्रुक शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. त्यानंतर मेढा येथे हेमंत गायकवाड (उपाध्यक्ष),जयसिंग रोकडे,बळवंत कांबळे, बळवंत बगाडे,विजय गंगावणे आदी तालुक्यातील पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने मानकुमरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी पुतळा उभारणी संदर्भात चर्चा केली. पंचायत समितीत याबाबतचा ठराव संमत करून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन मानकुमरे यांनी